कुडाळ येथे भव्य आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा

कुडाळ: येथील प्रिन्स स्पोर्ट क्लब, समादेवी मित्रमंडळ व श्री देव कलेश्वर मित्रमंडळ आयोजित खुली आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा बुधवार दि. ८ जानेवारी ते रविवार दि. १२ जानेवारी २०२५ या कालावधीत कुडाळ येथील तहसिलदार कार्यालयाच्या पाठीमागील भव्य मैदानावर होणार आहे. विजेत्या संघास रोख रु. १ लाख व आकर्षक चषक व उपविजेत्या संघास ५० हजार रु. व आकर्षक चषक. तसेच अन्य बक्षिसे देण्यात येणार आहेत. • उपांत्य सामन्यात पराभूत संघाला रोख रु. ५,५५५/- श्री. प्रदीप माने यांजकडून • उपांत्य सामन्यात पराभूत संघाला रोख रु. ५,५५५/- श्री. अनिल कुळकर्णी यांजकडून • अंतिम सामना सामनावीर रोख रु.२,५५५/- श्री. महेश कुडाळकर यांजकडून • उपांत्य सामानातील सामनावीर रोख रु.२,५५५/- श्री. बंड्या सावंत यांजकडून • उपांत्य सामन्यातील सामनावीर रोख रु.२,५५५/- श्री. नितीन परब यांजकडून • अंतिम सामना सामनावीर ऑरेंज मिक्सर श्री. अतुल सामंत यांजकडून • उत्कृष्ट फलंदाज रोख रु. २,५५५/- श्री. चंद्रशेखर बाईत यांजकडून • उत्कृष्ट गोलंदाज रोख रु. २,५५५/- श्री. वैभव परब यांजकडून • उत्कृष्ट यष्टिरक्षक रोख रु. २,५५५/- श्री. कौस्तुभ पाटणकर यांजकडून • उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोख रु. २,५५५/- श्री. अरूण खानोलकर यांजकडून मॅन ऑफ दी सिरीज आकर्षक भेटवस्तू श्री. अतुल सामंत यांजकडून • प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ दी मॅच आकर्षक भेटवस्तू श्री. अरूण खानोलकर यांजकडून. सदर स्पर्धेत मर्यादित संघ घ्यावयाचे असल्याने आपल्या संघाची नावे प्रवेश फी सह दिनांक १ जानेवारी २०२५ पर्यंत खाली दिलेल्या प्रतिनिधींकडे देण्यात यावीत.प्रवेश फी रु.५,०००/-स्थळ : तहसिलदार कुडाळ कार्यालयाच्या पाठीमागील भव्य क्रीडांगण.संपर्क : सुनिल धुरी मोबा. ९४२१२६१३००, सचिन कांबळी मोबा. ९४२३३०४१५९ यांच्याशी संपर्क साधावा.आपल्या संघाचा प्रवेश निश्चित करण्यासाठी गुगल पे द्वारे नितीन नेमळेकर, मोबा. ९४२२०७५६२३ मोबाईल क्रमांकावर प्रवेश फी भरण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *