महावितरणची लकी ड्रॉ योजना

मुंबई: राज्यातील महावितरण कंपनीने ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना सुरू केली आहे. लकी डिजिटल ग्राहक योजना असे योजनेचे नाव असून ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरण्याचा टक्का वाढावा हा त्यामागचा हेतू आहे.31 मार्च 2024 नंतर सलग तीन महीने ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर दुसरीकडे 1 जानेवारी ते 31 मे 2025 पर्यंत नियमित ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना संधी उपलब्ध करून देणार आहेत.

लकी ड्रॉ कसा काढला जाणार?

तीन मासिक लकी ड्रॉ योजना-उपविभाग स्तरावर आयोजित केला जाणार. योजनेच्या कालावधीत सलग मागील तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिन्यांपासून ऑनलाइन पद्धतीने पैसे भरणाऱ्या आणि रु 10 /- पेक्षा कमी थकबाकी असलेल्या ग्राहकांसाठी योजनेचा कालावधी पाच महिने असणार. एप्रिल 2025, मे 2025 आणि जून 2025 मध्ये अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा लकी ड्रॉ काढण्यात येईल. सदर योजने अंतर्गत लकी ड्रॉ ऑनलाइन पद्धतीने काढला जाईल.योजनेस कोण पात्र ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू (LT Live) वीजग्राहकांसाठी लागू असेल, ज्यांनी 1 एप्रिल 2024 पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही. सदर योजना सार्वजनिक पाणीपुरवठा आणि पथ दिवे श्रेणीतील ग्राहकांना, तसेच फ्रँचायझी क्षेत्रातील ग्राहकांना लागू राहणार नाही. ग्राहकास योजनेच्या कालावधीत ऑनलाइन भरणा पर्याय (नेट बॅकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, NACH, क्यूआर कोड, NEFT, RTGS इ.) वापरून सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने भरणा करणे आवश्यक राहील. लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिन्यात, दरमहा एक असे, ऑनलाईन भरणा पर्याय वापरून देयक अदा करणे आवश्यक राहील. दरमहा वीज देयक भरणा किमान रक्कम रु. 100/- असणे आवश्यक आहे.ज्या महिन्यामध्ये लकी ड्रॉ घोषित केला जाईल,त्याच्या आधीच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी ग्राहकाची वीज देयक थकबाकीची रक्कम रु.10/-पेक्षा कमी असावी. योजनेच्या कालावधीत ग्राहक /ग्राहक क्रमांक फक्त एकाच बक्षिसासाठी पात्र असेल.

बक्षीसे काय असणार?

प्रथम – स्मार्ट फोन,दुसरे – स्मार्ट फोन,तिसरे – स्मार्ट घड्याळ

नियम व अटी काय?

१.सदर योजना महावितरणच्या वतीने ग्राहकांना ऑनलाइन पेमेंट करण्यास प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नांपैकी एक आहे. सदर योजना कोणत्याही प्रकारचे जुगार किंवा तत्सम गोष्टींना पाठिंबा / प्रोत्साहन देत नाही.

२.सदर योजना सर्व ग्राहकांना विजेते बनवण्याची हमी देत नाही.

३.सदर योजने अंतर्गत विजेत्यांच्या निवडीसाठी पारदर्शक संगणकीय पद्धतीने याद्रीच्छिक क्रमांक निवड प्रक्रिया वापरली जाईल.

४.सदर योजने बाबत ग्राहकांना जागरूक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले जातील परंतु महावितरण प्रत्येक ग्राहकाशी थेट संवाद साधण्याची हमी देत नाही.

५.सदरचा लकी ड्रॉ निलंबित कारणेबाबतचा निर्णय पूर्णपणे महावितरणच्या अखत्यारीत राहील. आणि कोणताही विजेता ग्राहक अशा बक्षीसावर दावा करू शकत नाही.

६. विजेत्याने ओळखीचा पुरावा जसे की पॅन कार्ड आणि वास्तव्याचा पुरावा जसे की आधार कार्ड आणि चालू महिन्याचे वीज देयक व देयक भरणा केल्याची प्रत सादर करणे आवश्यक आहे.

७.भाषांतरित आवृत्ती मधील एखादया अटी व शर्तीच्या अर्थाबाबतीत विवाद असल्यास इंग्रजी अवृत्ती ग्राह्य धरण्यात येईल.

८.सविस्तर अटी आणि शर्तीसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत स्थळावर भेट द्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *