सुदैवाने चालक बचावला…
मालवण : तालुक्यातील कोळंब येथील पुलानजीकच्या रस्त्यावर वाळूने भरलेल्या डंपर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर पलटी होऊन अपघात झाला. ही घटना सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. या अपघातात सुदैवाने चालक बचावला आहे.
दरम्यान या अपघात प्रकरणी पोलिसांनी डंपर चालकास ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. तर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला असून दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.
हडीहून मालवणच्या दिशेने वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो पलटी झाल्याची घटना कोळंब येथील पुलानजिकच्या रस्त्यावर घडली. या अपघातात डंपरचालक सुजितकुमार सिंग मूळ रा. झारखंड सध्या रा. पेडणे गोवा हा सुदैवाने बचावला. या अपघाताची माहिती मिळताच येथील पोलीस ठाण्याचे हेमंत पेडणेकर, सुशांत पवार, अजय येरम यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. या अपघातप्रकरणी डंपर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.