विनापरवाना एक झाड तोडल्यास ५० हजार रुपये दंड आकारण्याच्या भाजप सरकारच्या विधेयकाला शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी केला विरोध

शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असलेले विधेयक रद्द करा भास्कर जाधवांची मागणी

नागपूर: महसूल आणि वनविभागाच्या परवानगी शिवाय अनधिकृतपणे झाडे तोडल्यास एका झाडामागे ५० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.आणि झाड तोडणाऱ्यास २ वर्षाची शिक्षा होणार अशी तरतूद असलेले विधेयक भाजप सरकारने हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या सभागृहात मंजुरी करिता मांडले आहे. या विधेयकामुळे कोकणातील शेतकरी अडचणीत येणार असून शेतकऱ्यांना स्वमालकीची झाडे देखील तोडता येणार नाहीत. हे विधेयक मंजूर झाल्यास अधिकारी देखील शेतकऱ्यांना विनाकारण छळतील. त्यामुळे शेतकऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात आवाज उठवत हे विधेयक रद्द करण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *