सिंधुदुर्ग : सिंधुदर्पणचे संचालक चिन्मय घोगळे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) नेते रतनभाऊ कदम यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.
रतनभाऊ कदम कदम यांचा सोमवारी छोटासा अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. चिन्मय घोगळे यांनी आज त्यांची भेट त्यांची विचारपूस केली. यावेळी रतनभाऊ कदम यांनी चिन्मय घोगळे यांना संविधानाची प्रत भेट म्हणून दिली. तसेच सिंधुदर्पण न्युज चॅनेलच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.