कुडाळमध्ये २२ ला शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा

न्या. जी. ए. कुलकर्णी आणि न्या. पी. आर. ढोरे यांची माहिती

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वकील संघ वगैरेंचे सहकार्य

कुडाळ : आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा आणि सामान्य लोकांचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे अशा लोकांना शासकीय योजनांची आणि सेवांची माहिती मिळावी यासाठी कुडाळ मध्ये रविवारी २२ डिसेंबरला शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमान कुडाळ मध्ये हा महामेळावा होणार आहे. अशी माहिती अशी माहिती कुडाळचे दिवाणी न्यायाधीश जी ए कुलकर्णी आणि सह दिवाणी न्यायाधीश
पी. यांनी दिली. ते बुधवारी सायंकाळी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.


या पत्रकार परिषदेला यावेळी महाराष्ट्र गोवा बार कोन्सिलचे अध्यक्ष ऍड संग्राम देसाई, सह दिवाणी न्यायाधीश पी बी ढोरे, कुडाळ तालुका वकील संघाच्या अध्यक्षा ऍड. राजश्री नाईक, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. राजीव बिले उपस्थित होते. यावेळी न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांनी सांगितले कि, रविवार दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता बँ.नाथ पै‍ शिक्षण संस्था, एम.आय.डी,पिंगुळी ता. कुडाळ येथे शासकीय सेवा व योजनांच्या या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती नितीन बोरकर, प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष हेमंत गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हा मेळावा चालणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती पुजार, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, महाराष्ट्र ॲण्ड गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲङ संग्राम देसाई, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲङ परिमल नाईक आदी उपस्थितीत राहणार आहेत. या मेळाव्यातून शासनाच्या विविध योजनांची लोकांनी माहिती घ्यावी असं आवाहन न्यायाधीश जी ए कुलकर्णी यांनी केले आहे.
सहा दिवाणी न्यायाधीश पी. आर. ढोरे यांनी यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगितली. या योजनांचे सुमारे ३२ स्टॉल्स या मेळाव्यामध्ये असणार आहेत. या योजनांची लोकांनी माहिती घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ऍड. संग्राम देसाई यांनी देखील या महामेळाव्याबद्दल माहिती दिली. मेळाव्याचे स्वरूप आणि उद्देश त्यांनी समजावून सांगताना शासनाच्या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम विधी प्राधिकरणाचे आहे. पण बऱ्याचवेळा सामान्य माणसाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला नाही कि ते न्यायालयात जातात. त्यासाठी लोकांमध्ये जागृती व्हावी म्हणून या महामेळाव्याचे आयोजन केल्याचे ऍड. देसाई यांनी सांगितले. तर कुडाळ तालुका बार संघाच्या अध्यक्षा ऍड. राजश्री नाईक यांनी देखील जास्तीत जास्त लोकांनी या महायोजना मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी कुडाळ वकील संघाचे उपाध्यक्ष ऍड. अविनाश परब, सचिव महेश शिरपूकडे, खजिनदार अमित सावंत, तसेच ऍड. गौरी देसाई, ऍड. निलांगी रांगणेकर-सावंत, ऍड. आनंद गवंडे, ऍड. निखिल गावडे, ऍड. मिहीर भणगे, ऍड. राजीव कुडाळकर आदी पदाधीकारी आणि विधिज्ञ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *