कणकवली रेल्वे स्टेशन येथील श्री गोठणदेव मंदिराचा २२ ते २३ डिसेंबरला कलशारोहण सोहळा


कणकवली : रेल्वे स्टेशन येथील श्री गोठणदेव मंदिराचा २२ ते २३ डिसेंबरला जिर्णोद्धार, कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


रविवार २२ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वा. पासून पुण्याहवाचन, देवता स्थापन, जलाधिवास, कलशारोहण, मुख्य देवता स्थापना, प्राणप्रतिष्ठा, महापूजा व आरती, सकाळी ८ वा.परबवाडी ते गोठणदेव मंदिर ढोलताशांच्या गजरात कलशदिंडी, पाषाणदिंडी मिरवणूक, दुपारी १२.३० वा. महाआरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ४ वा. स्थानिक ग्रामस्थांची सुश्राव्य भजने, रात्रौ ९ वा. श्री वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ, तेंडोली यांचा कलयुगाचे इच्छित दाता अर्थात जय जय स्वामी योगीराज हा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग. सोमवार २३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. नंतर महाआरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ४ वा. स्थानिक सुश्राव्य भजने, रात्रौ ९ वा. बुवा संदिप पुजारे विरुद्ध बुवा समीर कदम यांचा डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री ब्राम्हणदेव मित्रमंडळ परबवाडी-कणकवली यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *