शिधा पत्रिकेवर कुटुंबातील सदस्यांचे नाव नोंदवायचे आहे ?ह्या स्टेप फॉलो करा

ब्युरो न्यूज: जर तुमच्या घरातील शिधापत्रिकेमध्ये तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव अजूनही जोडले गेले नाही तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही घरबसल्या सदस्याचे नाव ऑनलाइन पद्धतीने शिधापत्रिकेमध्ये जोडू शकाल. यासाठी तुमच्याकडे कुटुंबप्रमुखाचे शिधापत्रिका आणि त्याची फोटो कॉपी असणे आवश्यक आहे.शिधापत्रिकेमध्ये मुलांचे नाव जोडायचे असल्यास मुलाचा जन्म दाखला त्यासोबत पालकांचे आधार कार्डही आवश्यक आहे. तसेच शिधापत्रिकेमध्ये जर विवाहित महिलेचे नाव जोडायचे असल्यास त्या महिलेचे आधार कार्ड, लग्नाचा दाखला आणि आई- वडिलांचे रेशनकार्ड आवश्यक आहे.

ही ऑनलाईन प्रक्रिय फॉलो करा

• ऑनलाईन शिधापत्रिकेमध्ये तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नाव जोडण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

• यानंतर तुम्हाला एक आयडी तयार करावा लागेल. जर तुमचा आयडी आधीच तयार झाला असेल तर तुम्हाला लॉगिन करावं लागेल.

• लॉगिन केल्यानंतर तुम्हाला शिधापत्रिकेबद्दल माहिती / पर्याय दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला नवीन मेंबर अॅड करण्याचा पर्याय मिळेल. त्या पर्यायावर जाऊन नवीन सदस्य जोडण्यासाठी फॉर्म भरा.

• त्यासोबतच नव्या सदस्याचा संपूर्ण तपशील भरावा लागणार आहे. सदस्याचा फॉर्म भरू झाल्यावर त्या व्यक्तीची कागदपत्रे अपलोड करा.

• संपूर्ण माहिती भरल्यानंतर डॉक्युमेंटेशन केल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल.

• फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. तुम्ही यात नोंदणी क्रमांकासह तुमची विनंती ट्रॅक करू शकता.

• यानंतर तुमचा फॉर्म आणि तुमची कागदपत्रं तपासली जातील. सर्व काही बरोबर असेल तर नवीन सदस्याचे नाव रेशनकार्डमध्ये जोडले जाईल.

• त्याही तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन आपल्या शिधापत्रिकेमध्ये नाव अपडेट करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *