कुणी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर…
मंत्री नितेश राणे यांचा संजय राऊत यांना इशारा
नागपूर प्रतिनिधी: नागपूरच्या विधिमंडळाबाहेर मंत्री नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी संजय राऊत यांना इशारा दिला आहे. व्यवस्थित तोंड उघडावे. सगळ्या गोष्टींवर आमचं बारकाईनं लक्ष आहे, अशी वॉर्निंग नितेश राणे यांनी संजय राऊत यांना दिली आहे.
मंत्री झाल्यानंतर संजय राऊतांनी शुभेच्छा दिल्या का? हा प्रश्न विचारल्यावर नितेश राणे म्हाले, “महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा द्याव्यात एवढं संजय राऊत आणि त्यांच्या मालकाचे (उद्धव ठाकरे) मन मोठे नाही. आम्ही त्यांना 39 वर्षे झालं ओळखत आहे. अशा लोकांच्या शुभेच्छा आम्हाला नको आहेत.”संजय राऊत यांनी फक्त महाराष्ट्रात निट वागावे. व्यवस्थित तोंड उघडावे. सगळ्या गोष्टींवर आमचं पार बारकाईनं लक्ष आहे. सरकार आमचं आहे. कुणी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर प्रहार करण्यासाठी आम्ही तयार आहोत,” अशी भूमिका नितेश राणेंनी व्यक्त केली.