आ.नितेश राणेंच्या शपथविधी नंतर कुडाळ तालुक्यात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

कुडाळ प्रतिनिधी: तीन वेळा विजयाची हॅटट्रिक करून लोकप्रिय झालेले आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच कुडाळ तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करून विजय उत्सव साजरा केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई, तालुकाध्यक्ष दादा साईल, बंड्या सावंत, विनायक राणे, रुपेश कानडे, पप्प्या तवटे, संध्या तेरसे, सुप्रिया वालावलकर रेवती राणे, संदेश नाईक,नारकर विलास कुडाळकर तसेच मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

error: Content is protected !!