सावंतवाडी,मालवण,वेंगुर्ले, वैभववाडीत भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष
ब्युरो न्यूज: आ.नितेश राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्या नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून तसेच मिठाई वाटून जोरदार जल्लोष केला. मोती तलावाच्या काठावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदावले, माजी नगरसेवक गुरू मठकर आनंद नेवगी, उदय नाईक, साईनाथ जामदार संतोष मठकर ओंकार सावंत, पाटकर आदी उपस्थित होते.
वैभववाडीत कार्यकर्त्यांचा जल्लोष
वैभववाडी: कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच वैभववाडी भाजपाच्या वतीने कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करून मोठा जल्लोष केला. तसेच एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी नासीर काझी, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, नेहा माईणकर प्राची तावडे, बबलू रावराणे, रोहन रावराणे, रणजीत तावडे, श्रद्धा रावराणे, प्रदीप रावराणे, सुभाष रावराणे, संतोष बोडके, रवींद्र तांबे, परशुराम इसवलकर पुंडलिक पाटील. संताजी रावराणे, इब्राहिम काझी, शिवाजी राणे, उदय पांचाळ, अक्षय पाटील, गणेश मोहिते, आशिष रावराणे, दीपक माईणकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मालवण तालुक्यात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष
मालवण: मालवण तालुक्यात आ.नितेश राणेंच्या शपथविधी सोहळ्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई वाटप करून जल्लोष केला.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर कुडाळ मालवण विधानसभा संयोजक तथा जिल्हा बँक संचालक बाबा परब, सुदेश आचरेकर राजन वराडकर, महेश मांजरेकर, आबा हडकर विजय निकम, दीपक सुर्वे, विरेश पवार प्रमोद करलकर नंदू देसाई, माजी नगरसेविका पुजा करलकर, ममता वराडकर महानंदा खानोलकर तारका चव्हाण, स्मिता प्रभाळे, नंदिता हडकर, निलेश खोत, विक्रांत नाईक, नारायण लुडबे, महेश वरक, भाई मांजरेकर चंदू आचरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.
वेंगुर्लेत भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष
वेंगुर्ले: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात आमदार नितेशराणेंची वर्णी लागल्यावर वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. शहरात ठिक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, लाडु व पेढे वाटून आनोंदस्तोव साजरा करण्यात आला.वेंगुर्लेत मंत्रिमंडळाचा शपथविधी थेट पाहता यावा यासाठी भाजपा तालुका कार्यालयाच्या बाहेर स्क्रीन लावून शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर शरद चव्हाण, पप्पू परब, भूषण आंगचेकर बाबली वायंगणकर सुजाता देसाई, दादा केळुसकर दाजी परब, वसंत तांडेल, लक्ष्मीकांत कर्पे, जयंत मोडकर सत्यविजय गावडे, प्रणव वायंगणकर हेमंत गावडे, राहुल गावडे, राजबा सावंत, मनवेल फर्नांडिस, वैभव होडावडेकर मयुरेश शिरोडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.














 
	

 Subscribe
Subscribe









