सावंतवाडी प्रतिनिधी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्याकार्यालयाला आज भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांनी भेट देत उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान सावंतवाडीत होणाऱ्या कोकण प्रांत अधिवेशनात आपण नक्कीच उपस्थिती दर्शवू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. विद्यार्थी परिषदेचे ५९ वे कोकण प्रांत अधिवेशन सावंतवाडीत २७ ते २९ डिसेंबरच्या कालावधीत होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भेट दिली.यावेळी त्यांनी अधिवेशनाची माहिती घेऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली व पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, अधिवेशन स्वागतसमिती सचिव अतुल काळसेकर व्यवस्था सहप्रमुख डॉ. राजशेखर कार्लेकर शहरमंत्री स्नेहा धोटे, व्यवस्था प्रमुख चिन्मयी प्रभू खानोलकर अवधूत देवधर तुषार पाबळे, विनीत परब, सौरभ दांडगे, सिद्धेश म्हापसेकर दिग्विजय पाटील, जयवंत पवार गौरी वारंग आदि उपस्थित होते.