श्री. कलेश्वर विद्यामंदिर नेरूर येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

कुडाळ प्रतिनिधी: श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर येथे गुरुवार दिनांक १२ डिसेंबर व शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. वासुदेव नाईक (गटविकास अधिकारी, कुडाळ पंचायत समिती) असणार आहेत. तरी सर्वांनी विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमास उपस्थिती राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!