सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितली तारीख
मुंबई प्रतिनिधी: भाजपाचे नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता पुढील दोन ते तीन दिवसांत मिळणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?”आता सरकार स्थापन झालेलं आहे, सरकार अतिशय चांगलं काम करत आहे. आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होईल.मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर लगेचच मंत्रिमंडळाची बैठक होईल. काहीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. सर्व विभाग त्यांचं काम करत आहेत. चांगले निर्णय होत आहेत. आता लाडक्या बहिणींचा हप्ता देखील पुढील दोन ते तीन दिवसांत मिळणार आहे. कुठेही काहीही अडचण नाही”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.