कधी होईल PM किसान योजनेचा हप्ता जमा?;जाणून घ्या
ब्युरो न्यूज:केंद्र सरकारनं सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेतून शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये टाकते. आत्तापर्यंत पीएम किसानचे 18 हप्ते जारी करण्यात आले आहेत. 19 वा हप्ता कधी मिळणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासाठी विभागीय संकेतस्थळावर लक्ष ठेवावे लागणार आहे.
PM किसान योजनेशी मोबाईल नंबर लिंक करा
१.तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जा. म्हणजे CSC किंवा https://pmkisan.gov.in वर लॉग इन करा.
२.अपडेट मोबाइल नंबर’ पर्याय निवडा.शेतकरी बांधवांनो तुमचा मोबाईल नंबर दिल्यानंतर नोंदणीकृत आधार क्रमांक टाका आणि नवीन मोबाईल नंबर द्या.
३.यानंतर पडताळणीसाठी विनंती सबमिट करा.अशा प्रकारे लाभार्थी त्यांच्या हप्त्याची स्थिती जाणून घेऊ शकतात
PM किसानचा हप्ता कसा चेक कराल?
१.पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
२.‘लाभार्थी स्थिती’ मुख्यपृष्ठावर जा, येथे लाभार्थी स्थिती टॅबवर क्लिक करा.तुमचा तपशील एंटर करा,
३.ज्यामध्ये तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक समाविष्ट आहे.
४.तपशील सबमिट केल्यानंतर, वेबसाइटवर तुमची हप्त्याची स्थिती दिसेल.
PM किसान योजनेसाठी कसा कराल अर्ज?
१.सर्वप्रथम पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.
२.नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक कराविचारलेल्या फॉर्ममध्ये आवश्यक तपशील जसे की आधार क्रमांक, राज्य, जिल्हा आणि इतर संबंधित वैयक्तिक आणि बँक माहिती प्रविष्ट करा.
३.फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट आउट घ्या.













