कुडाळ प्रतिनिधी : अधिक व्यापक स्वरूपात लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचावी, या उद्देशाने महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. संजय ओक यांनी २४, २५ व २६ जानेवारी कालावधीत बालरोग शल्यचिकित्सा शिबिरात शस्त्रक्रिया करणार आहेत. मागील सात वर्षांत साधारण १५० लहान मुलांवर सिंधुदुर्गात येऊन त्यांनी विनामूल्य तत्त्वावर शस्त्रक्रिया केली आहे. त्यात त्यांना लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय येथील बालरोग शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. पारस कोठारी आणि त्यांच्या टीमची बहुमोल साथ लाभली आहे. हर्निया, अपेंडिक्स आदी शस्त्रक्रिया महिला व बाल रुगणालय येथे होणार आहेत. अधिक जटील आजारांवरच्या शस्त्रक्रिया सायन हॉस्पिटल येथे शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य तथा प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमार्फत करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, सुशीला गणेश निगुडकर ट्रस्टचे डॉ. संजय निगुडकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे उमेश गाळवणकर व या उपक्रमाचे समन्वयक डॉ. अमेय देसाई यांनी केले आहे.

कुडाळ येथे २४ ते २६ जानेवारी पर्यंत होणार बालरोग शल्य चिकित्सा शिबिर
1
/
104
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
1
/
104

Subscribe










