बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर आवाज उठवल्याने भारतीय वंशाच्या नागरिकांचा सन्मान काढून घेतला

मुंबई प्रतिनिधी: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या लोकांनी बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला म्हणून त्यांना दिलेला सन्मान परत घेतला आहे. भारतीय समुदायाच्या या दोन प्रमुख व्यक्तींची पदे काढून घेण्यात आली आहेत. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य रामी रेंजर आणि हिंदू कौन्सिल यूकेचे व्यवस्थापकीय विश्वस्त अनिल भानोत यांना देण्यात आलेला सन्मान मागे घेतला आहे. कोट्याधीश रामी रेंजर यांना CBE (कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर) पदावरून हटवण्यात आले आहे. तर अनिल भानोत यांना OBE (ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर) पदावरून हटवण्यात आले आहे.

error: Content is protected !!