राज ठाकरे यांच्या जन्मदिवस मनसेच्या वतीने श्री देव कलेश्वर मंदिर तलाव येथे धार्मिक तसेच पर्यावरण पूरक पारंपारिक वृक्षांचे रोपण करून साजरा.

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची संकल्पना

राज ठाकरे जन्मदिवसाच्या औचित्य साधून पंचवीस पारंपरिक फळ तसेच फुलांच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. भविष्यात कलेश्वर मंदिर तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊन विविध प्रकारचे पक्षी तसेच फुलपाखरे यांचा अधिवास वाढावा व याच अनुषंगाने पर्यटन वृद्धी ही होईल ज्यामुळे व्यापार वाढेल या दृष्टिकोनातून हे वृक्ष लागवड करण्यात आली. मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड व यामुळे हवामानात झालेला बदल ज्यामुळे वाढते तापमान लांबलेला पाऊस विचार करता पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी राज ठाकरे यांनी यावर्षी आपला जन्मदिवस बॅनर बाजी न करता पर्यावरण पूरक फळझाडे तसेच फुल झाडे लावण्याचे आवाहन केले होते. याच आव्हानाला प्रतिसाद देत आज नेरुर मनसेच्या वतीने श्री देव कलेश्वर नेरूर येथील प्रसिद्ध तलावाच्या चहू बाजूला मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या संकल्पनेतून कैलासपती, बकुळ, नाग चाफा, सोनचाफा, धूप, रुद्राक्ष, उद, सीता अशोक यासारखे वेगवेगळ्या जातीचे 25 दुर्मिळ दुर्मिळ रोपांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, देवस्थान कमिटीचे माजी अध्यक्ष प्रदीप उर्फ गोटू नाईक, जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावस्कर, महाराष्ट्र सैनिक अक्षय जोशी, सुरज नेरूरकर , अनिकेत ठाकूर, सर्वेश ठाकुर,अजय जोशी,उमेश परब. शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य प्रविण नेरुरकर, अमोल शृंगारे व नेरुरमधील ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!