सिंधुदुर्गनगरी: जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात एकजूट राहण्याची शपथ घेत समाजात शांतता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या, दहशतवाद ही मानवतेसाठी अत्यंत घातक प्रवृत्ती असून त्याचे परिणाम संपूर्ण समाजावर होतात. समाज माध्यमांमध्ये समाजविघातक विचार पसरविण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सजग राहून चुकीच्या माहितीपासून सावध राहणे आवश्यक आहे. समाजात शांतता, सहिष्णुता आणि परस्पर विश्वास टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. युवकांनी सामाजिक माध्यमांचा सकारात्मक वापर करावा तसेच देशविघातक आणि हिंसक प्रवृत्तींना वेळीच रोखावे. राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यानंतर जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली. कार्यक्रमात दहशतवादमुक्त, शांततामय आणि सुरक्षित समाज निर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, आरती देसाई, प्रतिभा वराळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
1
/
107
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
1
/
107


Subscribe








