करूळ गावावर शोककळा
वैभववाडी / प्रतिनिधी : करुळ जामदारवाडी धरणात तीन मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या तीनही शाळकरी मुली असून दोघी करुळ भोयडेवाडी येथील तर एक कुसूर येथील आहे. मामाच्या गावी आली होती ही घटना बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
करुळ जामदारवाडी येथील धरणात अंघोळीसाठी गेलेल्या तन्वी अनंत माळकर (16) करुळ, स्वरा संदीप सुर्वे (11) कुसूर ऋतिका संतोष पाटील (14) करुळ यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असणाऱ्या तिघांचे प्राण वाचले आहेत
4 तरुणी आणि 2 तरुण असे एकूण 6 जण करुळ जामदार वाडी येथील धरणात अंघोळी साठी गेले असता पोहण्या मोह आवरता आला नाही त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने तिघी जणी पाण्यात बुडाली बाराच वेळ दिसून न आल्याने शोधाशोद केली असता पाण्यात बुडाल्याचे सहकाऱ्याच्या लक्षात आले त्यांनी आरडावोरड केली. गावातील काहींनी धरणाच्या दिशेने धाव घेतली ताबडतोब त्या तिघीना बाहेर काढले परंतु प्राण वाचविण्याचे प्रयत्न अपयेशी ठरले नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. एकूणच या दुर्दैवी घटनेने करुळ गावावर शोककळा पसरली आहे या बाबत पोलीस तपास करीत आहेत.


Subscribe









