पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मोबाईल व्हॅनचे उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी: जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आणि अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत 'सामाजिक न्याय तसेच विविध विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची' जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या मोबाईल व्हॅनचे आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या फित कापून उद्घाटन करण्यात आले. प्रचार व प्रसिध्दी करणाऱ्या या ५ मोबाईल व्हॅन जिल्ह्यातील विविध गावांत जाऊन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती पोहोचविणार आहेत.
पोलिस कवायत मैदानात आज हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम साईल, जिल्हाधिकारी तृप्ती धोडिमिसे, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मोबाईल व्हॅनव्दारे जिल्ह्यात होणाऱ्या जनजागृती व योजनांविषयीची माहिती जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपक्रमाविषयी पालकमंत्री नितेश राणे यांनी समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
1
/
104
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
1
/
104


Subscribe










