
गावागावात पुन्हा शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार – वैभव नाईक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नूतन सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख माजी आमदार वैभव नाईक यांनी आज वेंगुर्ले शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात भेट दिली. याप्रसंगी वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने वैभव नाईक यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी वैभव नाईक यांनी संवाद साधत वेंगुर्ले येथील प्रश्नांवर चर्चा केली.
वैभव नाईक पत्रकारांशी बोलताना म्हणाले, वेंगुर्ले तालुका हा गेली अनेक वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र यावेळी लोकांची दिशाभूल करून,पक्ष फोडून सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्या. तरीही जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखवत आमचे काही जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक निवडून दिले. हा बालेकिल्ला पुन्हा उभारण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी विभागवार दौरा करून गावागावात पुन्हा शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. शिवसेना तळागाळातला पक्ष आहे. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेकडून संधी दिली जाते.येथील स्थानिक आमदार फक्त निवडणुकीला मतदारसंघात येतात त्यामुळे वेंगुर्ले येथील प्रश्न जैसे थे आहेत. त्यावर आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आवाज उठविणार असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, बाळा गावडे , वेंगुर्ले तालुकाप्रमुख निलेश चमणकर, जि. प. सदस्य विजय नाईक, जि. प. सदस्य संजय गावडे, शहरप्रमुख शैलेश परुळेकर, महिला आघाडी प्रमुख साक्षी चमणकर, महिला विधानसभा प्रमुख सुकन्या नरसुले, सौ. खानोलकर,शाखा प्रमुख गजानन गोलतकर,अभिमन्यू भुते,लक्ष्मी पेडणेकर,सौ. साटेलकर,दिलीप राणे,अण्णा फडतरे,सौ. वालावलकर,गोविंद परब,समीर शेटकर, दत्ताराम केळजी,अशोक नाईक,आबा चिपकर, वैभव फटजी आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111



Subscribe










