इनविटेशनल राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची चमकदार कामगिरी लीनांशा हितेश नाईक हिने पटकविला ऑलराऊंडर चषक

आय एम सी क्लब ऑफ इचलकरंजी व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इनविटेशनल इंटरस्टेट स्विमिंग कॉम्पिटिशन 2026 ही शंकरराव पुजारी ओलंपिक साईज स्विमिंग पूल इचलकरंजी मियुनिसिपल कॉर्पोरेशन येथे पार पडली ज्यामध्ये लीनांशा हितेश नाईक या चिमुकलीने 50 मीटर ब्रेस्ट्रोक मध्ये द्वितीय क्रमांक , 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये प्रथम क्रमांक व 50 मीटर बटरफ्लाय मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला सोबतच तिला ऑलराऊंडर चषक सुद्धा मिळाले त्याचबरोबर समर्थ निबरे या चिमुकल्याने 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला बाकी इतर जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी दाखवत चौथा व पाचवा क्रमांक पटकाविला ज्यामध्ये उत्कर्ष विद्याधर निवतकर , राघव वालावलकर, वेदांत साठे, शिवांश खोत , स्वराज सावंत ,वेदांत फोपळे , मार्क डिसूजा , रिषभ जाधव इत्यादी स्पर्धकांनी सहभाग केला या सर्व जलतरणपटूंना प्रशिक्षण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य जलतरण प्रशिक्षक श्री प्रवीण सुलोकार यांनी सिंधुदुर्ग नगरी जलतरण तलाव येथे दिले.

सर्व स्पर्धकांचे कौतुक करून अभिनंदन सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी श्री .विजय शिंदे यांनी केले व सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विजयी स्पर्धकांना बक्षीस श्री गंगाराम बर्गे इव्हेंट डायरेक्टर जलतरण स्पर्धा इचलकरंजी व श्री आनंद माने अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्याकडून देण्यात आले

error: Content is protected !!