वन शहिदांचे स्मारक आणि ध्वजस्तंभ उभारण्यासाठी “ती” वृक्षतोड…

वन अधिकाऱ्यांची सारवासारव; परशुराम उपरकरांकडून दखल, वरिष्ठ स्तरावर तक्रार

सावंतवाडी : वनविभागाच्या कार्यालयाच्या परिसरात वनशहिदांचे स्मारक आणि ध्वजस्तंभ नव्याने उभारण्याबाबत अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि त्या अनुषंगाने आम्ही परिसरात असलेली झाडे तोडली अशी सारवासारव सावंतवाडी वनविभागाचे सहायक उपवनसंरक्षक सुनील लाड यांनी शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या कडे केली.

​दरम्यान वनविभागाच्या कार्यालयात असलेली झाडे नेमकी कोणत्या कारणासाठी तोडली त्यासाठी कोणाचे आदेश घेण्यात आले पुढे काय केले जाणार आहे याची सखोल माहिती द्या अशी मागणी श्री उपरकर यांनी माहितीच्या अधिकारात वनविभागाकडे केली आहे. तसेच याबाबत आपण वनसंरक्षक कोल्हापूर यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी तालुकाप्रमुख राजू शेटकर, आशिष सुभेदार, संतोष सावंत, आबा चिपकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री उपरकर यांनी श्री लाड यांच्याशी चर्चा केली तसेच आपण याबाबत माहीतीच्या अधिकारा खाली माहीती मागितली आहे तसेच तोड करण्यात आलेल्या वृक्षाबाबत वनसंरक्षकांकडे तक्रार केली आहे त्यामुळे या प्रकरणी जबाबदार कोण याची माहीती द्या अशी मागणी केली.

यावेळी ध्वजस्तंभ आणी वनशहीदांचे स्मारक उभारण्यासाठी त्या ठीकाणी झाडे तोडण्यात आली उद्यानातील झाडे तोडुन आता त्या ठीकाणी नव्याने खेळणी बसविण्यात येणार आहे त्यामुळे काही झाले तोडावी लागली याबाबत आम्ही अधिकार्‍यांनी चर्चा केली होती. वसाहतीत राहणार्‍या कर्मचार्‍यांची मुले रस्त्यावर खेळत होती. त्यामुळे हा निर्णय घेतला असे लाड यांनी सांगितले.
मात्र झालेली वृक्षतोड ही चुकीची आहे वन अधिकार्‍यांकडुन असा प्रकार होणे योग्य नाही त्यामुळे याबाबत आपण वरिष्ट स्तरावर नक्कीच दाद मागू असे उपरकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!