सावंतवाडीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या

सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ

सावंतवाडी : शहरात काळजाचा थरकाप उडवणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. अभ्यासाच्या कंटाळ्यामुळे काल एका अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या लागोपाठच्या घटनांमुळे संपूर्ण सावंतवाडी परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

ही धक्कादायक घटना आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शहरातील बिरोडकर टेंब परिसरात घडली. संबंधित मुलीने राहत्या घरी गळफास घेतल्याचे समजताच तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचे निधन झाले होते, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या मुलीने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. आत्महत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बिरोडकर टेंब परिसरातील नागरिकांनी आणि शहरातील अनेकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. कालच शहरातील एका मुलाने गॅलरीतून उडी मारून आपले जीवन संपवले होते आणि काही तास उलटत नाहीत तोच आज ही दुसरी घटना घडल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या सलग घटनांमुळे शहरावर शोककळा पसरली आहे.

error: Content is protected !!