शिक्षणाला कंटाळून १७ वर्षीय तरुणाची उडी मारून आत्महत्या

सावंतवाडीतील हृदयद्रावक घटना

सावंतवाडी : शहरात बिरोडकरटेंब येथे वास्तव्यास असलेल्या तन्मय गावडे (१७) मूळ रा. चौकुळ, ता. सावंतवाडी या अल्पवयीन युवकाने शिक्षणाला कंटाळून घराच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. गॅलरीतून उडी मारल्यामुळे तन्मय गावडेचा पाय फॅक्चर झाल्याने तन्मयच्या वडिलांनी तात्काळ सावंतवाडी पोलिसांशी संपर्क करून पोलीस वाहनाने तन्मयला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने अधिक उपचारासाठी त्याला गोवा – बांबोळी येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा तन्मयचा मृत्यू झाला. दरम्यान, आत्महत्येपूर्वी तन्मयने लिहिलेली चिट्ठी सापडली असून मला आता शिकायचे नाही. मी आत्महत्या करणार असून, माझ्या मरणास कोणाला जबाबदार धरू नये असे नमूद केले. तन्मयने उचललेल्या टोकाच्या पावलाने कुटुंबावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!