आमदार निलेश राणे यांचे विशेष प्रयत्न
कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील पांग्रड येथील पांग्रड महादेव मंदिर तळी पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ४ कोटी ५० लक्ष एवढी रक्कम मंजूर झालेली असून कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला असून याचा पायाभरणी समारंभ रविवार दि. १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार असल्याचे पांग्रड ग्रामस्थ मंडळाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे. श्री संतोष मर्गज यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे.पांग्रड गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेला असून राणे साहेबांच्या माध्यमातून अनेक विकास कामे या ठिकाणी झालेली आहेत. या तलाव सुशोभीकरणामुळे गावात येणाऱ्या पर्यटकांची रहदारी वाढेल असा विश्वास आहे.

Subscribe










