ब्युरो न्यूज: वर्षाच्या शेवटच्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली. 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरमागे 16.52 रुपयांची वाढ करण्यात आलीय. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं गॅसच्या किमती वाढवल्यात. एका सिलेंडरची किंमत 1 हजार 771 रुपये असणारेय. याचा हॉटेल व्यावसायिकांना फटका बसण्याची शक्यता असून हॉटेलमधील जेवणही महागण्याची शक्यताये.