कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये पी. एस.चोडणकर ज्वेलर्स मार्फत रंगभरण स्पर्धा आयोजित

सावंतवाडी प्रतिनिधी: येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये सावंतवाडीतील प्रथितयश सुवर्ण अलंकार व्यावसायिक पवन चोडणकर यांच्या पी.एस.चोडणकर ज्वेलर्स मार्फत इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पहिली ते दुसरी व तिसरी ते चौथी या दोन गटांमध्ये ही स्पर्धा राबविण्यात आली.

या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी व्यासपीठावर पी.एस.चोडणकर ज्वेलर्सचे मालक पवन चोडणकर, त्यांचे कर्मचारी वर्ग, कळसुलकर हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक सूर्यकांत भुरे, माजी मुख्याध्यापक मानकर सर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत पालक संघा च्या उपाध्यक्षा सौ. उमा बांदेकर, सौ.गिरप, सौ. टिळवे, प्राथमिक शाळेचे शिक्षक, तसेच कलाशिक्षक केदार टेमकर सर उपस्थित होते.यावेळी दोन गटात झालेल्या रंगभरण स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन मान्यवरांचा हस्ते गौरविण्यात आले यामध्ये

इयत्ता पहिली व दुसरीच्या गटातून

प्रथम क्रमांक- परी विनोद जाधव, द्वितीय- दर्श किशोर पडते, तृतीय- युगराज प्रदीप सावरवाडकर, उत्तेजनार्थ 1- अच्युत विनायक कदम, उत्तेजनार्थ 2- वेदश्री संतोष पालव *इयत्ता-तिसरी व चौथीच्या गटातून* प्रथम क्रमांक तनया पोपट बागुल, द्वितीय- कृष्णा उमेश पायशेट, तृतीय- दिव्या महेश भाईडकर, उत्तेजनार्थ 1- चैतन्य प्रदीप सावंत, उत्तेजनार्थ 2-अथर्व अर्जुन लाड यांना गौरविण्यात आले बक्षीस म्हणून प्रथम क्रमांक साठी सोन्याचे नाणे व प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक साठी चांदीची मूर्ती, प्रमाणपत्र तृतीय क्रमांक साठी चांदीचे नाणे व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ- 1 व 2- कलर बॉक्स व प्रमाणपत्र देऊन मुलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक डि.जी.वरक यांनी केले.

error: Content is protected !!