फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी
मुंबई प्रतिनिधी: महापरिनिर्वाण दिनानिमित्त पश्चिम रेल्वेने वेळापत्रकात काही महत्वाचे बदल केले आहेत.मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
कसे असेल वेळापत्रक?
ट्रेनक्रमांक 09001 भिवानी सुपरफास्ट स्पेशल मुंबई सेंट्रल येथून दर मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता निघेल. ही ट्रेन 3 ते 17 डिसेंबरदरम्यान धावणार आहे. तसेच ट्रेन क्रमांक 09002 ही गाडी भिवानी येथून दर बुधवार आणि शनिवारी दुपारी 2.45 वाजता सुटणार आहे. ही ट्रेन 4 ते 18 डिसेंबरपर्यंत धावणार आहे. वांद्रे-उधना स्पेशलचा विस्तार ट्रेन क्रमांक 09055 वांद्रे टर्मिनस-उधना स्पेशल यापूर्वी 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, ती 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९०५६ उधना-वांद्रे टर्मिनस स्पेशल या परतीच्या गाडीची मुदतही ३१ डिसेंबर वाढवण्यात आली असल्यानेप्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय
महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार फलाट तिकिटांच्या विक्रीवर 2 ते 9 डिसेंबरपर्यंत निर्बंध घातले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशविदेशातील लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात. त्यामुळे रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर प्रचंड गर्दी होते. त्यामुळे फलाटांवरील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने लांब पल्ल्यांच्या स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.













