चेंदवण ग्रामपंचायत येथील बहुउद्देशीय हॉल कामासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या ठेकेदार व अभियंता यांना आवश्यक सूचना

कुडाळ :चेंदवण ग्रामपंचायत येथील बहुउद्देशीय हॉल कामासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या ठेकेदार व अभियंता यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार बहुउद्देशीय हॉल बांधकाम सुरू करताना ग्रामपंचायत व ग्रामस्थांना विश्वासात न घेता कामाला सुरुवात करण्यात आली आणि अनेक तृटी निदर्शनास आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांना या संदर्भात सांगितले असता त्यांनी कामाची पाहणी करत अभियंता आणि ठेकेदार यांना त्या ठिकाणी बोलावून विविध सूचना दिल्या की लगतच शाळा असल्याने मुलांच्या जीविताच्या दृष्टीने सभोवताली तात्पुरती संरक्षक जाळी लावणे, फौंडेशनचे खड्यांची खोली वाढविणे तसेच ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांच्या सूचना विचारात घेणे आणि बांधकाम मजबूत करत पावसाळ्याच्या आधी पूर्ण करणे.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच श्री चेदवणकर, सदस्य भूपेश चेंदवणकर,माजी सरपंच सौ उत्तरा धुरी, सौ तेंडुलकर मॅडम, तंटामुक्ती अध्यक्ष गौतम चेंदवणकर,बाळू कोचरेकर,नारायण शृंगारे व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!