तीन दिवस रंगलेल्या क्रिकेट महासोहळ्याचा समारोह
महाराष्ट्र भाजपाचे युवा नेते श्री विशालजी परब, सावंतवाडी चे प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिलजी निरवडेकर यांच्या उपस्थितीत संपन्न, विजेत्या उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण
श्री देव रवळनाथ बॉईज क्लब सातार्डा आयोजित पंचक्रोशी प्रीमियर लीग 2026 स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा
पंचक्रोशीच्या वतीने पीपीएल २०२६ अर्थात पंचक्रोशी प्रीमियर लीग स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भाजपा महाराष्ट्र युवा नेते श्री विशाल परब, सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲडव्होकेट श्री अनिलजी निरवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या समारोह प्रसंगी क्रिकेट खेळाडू , प्रेक्षकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. अंतिम क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात युवा वर्गाचा फार मोठा सहभाग दिसून येत होता. तरुणाईची क्रेझ असलेले युवा नेतृत्व श्री विशालजी परब यांची उपस्थिती यावेळी सर्वांचे खास आकर्षण ठरले होते. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला या गाण्याप्रमाणेच डॅशिंग, कुशल आणि आक्रमक राजकारणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या विशाल परब यांच्याभोवती नेहमीप्रमाणेच पडणारे तरुणांचे गराडे या स्पर्धेच्या दरम्यान सुद्धा दिसून आले. यावेळी साई कवठणकर, अजित कवठणकर, प्रसाद आसोलकर, प्रवीण मांजरेकर, सातार्डा ग्रामपंचायत सदस्य अर्चना धारगळकर, दशरथ वेंगुर्लेकर, शर्मिला मांजरेकर आदी उपस्थित होते.


Subscribe










