श्रीराम नवमीचे औचित्य
आरवली : श्री रामनवमी चे औधित्य साधून श्री देव वेतोबा देवस्थान न्यास व भक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने स्तोत्र पठण स्पर्धा संपन्न झाली. इयत्ता दुसरी पर्यंत गणपती स्तोत्र, इयसा तिसरी आणि चौथी साठी मारुती स्तोत्र आणि पाचवी ते सातवी व आठवी पासून पुढे खुल्या गटात रामरक्षा स्तोत्र पठण स्पर्धा संपन्न झाली
श्री देव वेतोबा अन्नशांती सभागृहात संपन्न झालेल्या या स्तोत्र पठण स्पर्धेत लहान व मोठ्या गटात मिळून एकूण एकसष्ठ विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
श्री देव वेतोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री जयवंत राय यांच्या हस्ते श्री रामाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक व स्वागत श्री. रवींद्र पणशीकर यांनी केले. देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री जयवंत राय यांनी सदर सर्धा आयोजन करण्याचे उद्दिष्ट समजून सांगितले. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून श्री. रविंद्र पणशीकर, सौ. स्नेहा जोशी आणि सौ नम्रता राय यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत आरवली, शिरोडा, रेडी, आजगांव, आसोली, जोसोली, फणसखोल, सागरतीर्थ येथील सुमारे साठ स्पर्धकानी सहभाग नोंदवला यातील गुणानुक्रम् खालील प्रमाणे…
गट क्रमांक एक गणपती स्तोत्र
१)तन्वीज हरमलकर
२)अन्वी कोंबे
३)आर्वी गावडे
उत्तेजनार्थ
१)सुमुख नवाथे
२)गौरवी नाईक
मारुती स्तोत्र (इयत्ता तिसरी व चौथी)
१) मुग्धा मराठे
२)अर्णव धुरी
३)उत्कर्ष रगजी
उत्तेजनार्थ
१)साक्षी मोरे
२)अधिरा गावडे
रामरक्षा स्तोत्र (इयत्ता पाचवी ते सातवी )
१)मधुरा पाटणकर
२) चिन्मयी पालयेकर
३)प्रांजल आरोलकर
४)वेदांग मराठे(उत्तेजनार्थ)
राम रक्षा स्तोत्र (आठवीपासून पुढे सर्वांसाठी)
१)श्रेया रावजी राणे
२)पवन पाटणकर
३)धनश्री नवाथे
४)सौ मनस्वी शेटकर (उत्तेजनार्थ)
युगानुक्रमे १ ते ३ व उत्तेजनार्थ असे सर्व गटात रोख बक्षिसे व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाबद्दल प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले






Subscribe








