हुमरस येथे दिनांक १७ मार्च रोजी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तर १८ मार्च रोजी दशावतार नाट्यप्रयोग

आ. निलेश राणे व जि. प. सदस्य रुपेश कानडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा हुमरस यांचे आयोजन

योगिता कानडे/ कुडाळ : हुमरस येथे १७ मार्च रोजी निलेश राणे यांच्या आणि १८ मार्च रोजी रुपेश कानडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा हुमरसच्या वतीने सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे जंगी आयोजन करण्यात आले आहे.

कार्यसम्राट आमदार श्री. निलेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवार, १७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता जि.प. शाळा हुमरस येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नवनिर्वाचित जि.प. सदस्य श्री. रुपेशजी कानडे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजता दशावतारी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्थळ: जि.प. शाळा हुमरस जवळ, ता. कुडाळ.

नाटक: ‘श्री देवी माऊली दशावतार नाट्यमंडळ, इन्सुली’ यांचा नवा संच (२०२५-२६) आपला कलाविष्कार सादर करणार आहेत .

या दोन्ही कार्यक्रमांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना शाखा हुमरसच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!