नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ आयोजित खुल्या ओव्हरार्म क्रिकेट स्पर्धा संपन्न

जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

कुडाळ : नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ आयोजित खुल्या ओव्हरार्म क्रिकेट स्पर्धा दिनांक २८ फेब्रुवारी ते १मार्च २०२६ रोजी पार पडल्या. या स्पर्धेत जवळपास अठरा संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री रुपेशजी पावसकर यांच्या हस्ते करण्यात आले.या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी देवुळवाडा बॉईज नेरुर संघ ठरला या क्रमांकासाठी पहिले बक्षीस ५०००/- रुपये हे कै. महादेव उर्फ शशी (गुरुजी)अनंत नेरूरकर यांच्या स्मरणार्थ श्री तुषार महादेव नेरुरकर यांजकडून व चषक- सुखायु क्लिनिक,नेरुर डॉ.सोनाली परब यांजकडून तर द्वितीय क्रमांक श्री गजानन चौपाटी या संघाने मिळवला यासाठी चे बक्षीस रक्कम ३०००/- कै. ओमकार अशोक परब यांच्या स्मरणार्थ श्री गुरुप्रसाद केशव परब यांजकडून
व चषक – सुखायु क्लिनिक,नेरुर डॉ.सोनाली परब यांजकडून तर उपांत्य फेरीतील पराभूत पंचशील नगर व नवजीवन वाघोसेवाडी संघाना चषक कै.मनोहर शंकर शृंगारे यांच्या स्मरणार्थ श्री.शंकर मनोहर शृंगारे यांजकडून
मॅन ऑन सिरीज चषक खेळाडू सोनु राणे,आले
उत्कृष्ट फलंदाज चषक खेळाडू सोहेल,उत्कृष्टभारभ गोलंदाज,खात्यांचे खेळाडू संदीप नेरुरकर ,उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चषक खेळाडू संदीप कामत या सर्व खेळाडूंनी पटकावले या स्पर्धेसाठीचेचे चषक व इतर मदत विशाल पालव ,सुरज शृंगारे, सुजित कुमार शृंगारे आणि रुपेशजी पावसकर यांनी दिले.ही स्पर्धा वाघोसेवाडीतील वाळवाट मैदानावर पार पडली.
मंडळाने सर्व उपस्थित संघांचे ,दात्यांचे आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!