कणकवली : तालुक्यातील तिवरे गावातील भूमापन क्रमांक व उपविभाग ६७६ मधूल “जल जीवन मिशन” अंतर्गत तिवरे गावच्या नळयोजनेच्या विहिरीसाठी थ्री फेज विद्युत लाईन नेल्याप्रकरणी तेथील जमीन मालक विश्राम म्हाडेश्वर व वैभव म्हाडेश्वर यांनी यापूर्वी स्थगित केलेले आमरण उपोषण शुक्रवारी पासून पुन्हा सुरू करण्यात आले. यापूर्वी उपोषण केले त्यावेळी ग्रामपंचायतने याबाबत म्हाडेश्वर यांना पत्रव्यवहार करत सदर पोल बाबत गटविकास अधिकारी स्तरावरून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.
त्यानंतर संबंधित विभागांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली 27 फेब्रुवारी पर्यंत सदर लाईन अन्यत्र वळती करण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे. असे पत्र सरपंच तीवरे यांनी उपोषण कर्त्याना दिले. त्यानंतर सरपंच, उपसरपंच यांच्यासहित माजी सरपंच भाई
आंबेलकर व अन्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे उपोषण स्थगित करण्यात आले. तसेच दिलेल्या कालावधीत सदर काम मार्गी न लागल्यास पुन्हा उपोषण छेडले जाईल असा इशारा देखील महाडेश्वर यांनी दिला होता. त्यानुसार शुक्रवारपासून हे उपोषण तिवरे ग्रामपंचायतच्या समोर सुरू करण्यात आले आहे.


Subscribe










