मोठ मोठे गार केले… गंमत मधी…

पणदूरतिठा येथे लागलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा

कुडाळ : जिल्हा परिषद पंचायत समिती पावशी मतदार संघाचा निकाल जाहीर होताच, अवघ्या काही दिवसातच पणदूर तिठा येथे “मोठ मोठे गार केले… गंमत मधी…. चल चा बॅनर झळकला आहे. या बॅनरची चर्चा सध्या पणदूर पंचक्रोशी मध्ये पाहायला मिळते.

पावशी मतदारसंघात अगदी चुरशीची लढत पाहायला मिळाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अमरसेन सावंत विरुद्ध शिंदेशिवसेनेचे तुकाराम उर्फ दादा साईल यांच्यात चुरशीची लढत झाली. यामध्ये शिंदे शिवसेनेचे तुकाराम उर्फ दादा साईल विजयी झाले. मात्र त्यानंतर दयानंद अणावकर मित्र मंडळ या नावाने मोठे मोठे गार केले गंमत मधी चल ” किंग मेकर या हॅशटॅग खाली श्री दयानंद आणावकर यांचा फोटो झळकविण्यात आला आहे… मात्र याबाबत श्री दयानंद आणावकर यांना विचारणा केली असता आपला या बॅनरशी कोणताही संबंध नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आले… मात्र या बॅनरची जोरदार चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे

error: Content is protected !!