देशातील उत्कृष्ट सरपंच म्हणून केले सन्मानित
सिंधुदुर्ग : आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांचा दिल्ली येथे देशातील उत्कृष्ट सरपंच म्हणून सन्मान करण्यात आला. दिल्ली येथे भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाकडून आयोजित कार्यक्रमात एस.पी.सिंह बघेला यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी देशातील ६०० सरपंचांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील केवळ १६ जणांचा समावेश होता. त्यांच्या दिल्ली येथे झालेल्या सन्मानामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा रोवला गेला आहे.

Subscribe










