कुडाळ : महायुतीच्या आगामी रणनीतीच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे असे ऍड. यशवर्धन राणे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनतेमध्ये निर्माण झालेली भावनिक जवळीक, प्रेम, आणि विश्वास ही केवळ त्यांच्या नेतृत्वाचीच नव्हे तर महायुतीच्या यशाची देखील गुरुकिल्ली ठरू शकते.
सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दारावर येऊन ठेपल्या आहेत. अशा परिस्थितीत, एकनाथ शिंदे यांना महायुतीचे नेतृत्व आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुढे ठेवणे ही निवडणुकीसाठी परिणामकारक ठरेल. त्यांच्या लोकप्रियतेचा लाभ महायुतीच्या उमेदवारांना होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मजबूत पकड निर्माण करण्यासाठी मदत होईल.
एकनाथ शिंदे हे महायुतीसाठी केवळ एक चेहरा नाहीत, तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या नावावर आणि कामगिरीवर जनतेचा विश्वास आहे, आणि हा विश्वास महायुतीच्या विजयाचा पाया बनू शकतो. त्यामुळे महायुतीने त्यांना मुख्यमंत्री म्हणून अधिकृतपणे घोषित करणे ही काळाची गरज असल्याचे ऍड. यशवर्धन जयराज राणे यांनी स्पष्ट केले आहे.