ब्युरो न्यूज: बँक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी.तुम्ही जर बदली करून घेऊ इच्छिता तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त कारण केंद्र सरकारकडून बँक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणांमध्ये नव्यानं बदल केले जाण्याचा सल्ला देण्यात आला आहेत.
अर्थमंत्रालयाने एसबीआय (SBI), पीएनबी (PNB), बँक ऑफ बडोदा (BoB) यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (PSB) कर्मचाऱ्यांसाठी लागू असणाऱ्या ट्रान्सफर पॉलिसीमध्ये काही बदल करण्याची मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. केंद्रीय मंडळाकडून मान्यता मिळाल्यानंतर हे नवे नियम 2026 या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात येतील असंही अर्थमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बदल्यांचे धोरण पारदर्शी करण्यासाठी निर्णय
डिपार्टमेंट ऑफ फाइनेंशियल सर्विसे ने सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांना एक पत्र लिहित ट्रान्सफर पॉलिसीसंदर्भात समीक्षण केलं आहे. बदल्यांचं हे धोरण अधिक पारदर्शी करण्यासाठी हे नवे बदल मदत करतील असं त्यात नमूद करण्यात आलं आहे. या बदलांमध्ये बदली प्रक्रिया स्वयंचलित अर्थात ऑटोमॅटिक पद्धतीनं करत त्यासाठी गरजेचं असणारी ऑनलाईन प्रक्रिया आखत कर्मचाऱ्यांना बदलीचं ठिकाण निवडण्याची सुविधा देण्याचाही समावेश आहे.