कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कणकवली तालुका युवक अध्यक्ष नयन गावडे यांनी आपल्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी धक्का मानला जात आहे.वागदे गावातील काही ग्रामस्थांनी आज भाजपमध्ये प्रवेश केले असता आपल्या घरचेच भेदी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.पुढे बोलताना ते म्हणाले की यापुढे देखील आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे व महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत कायमस्वरुपी सोबत आहे.महाविकास आघाडीचा धर्म पाळणार असून महाविकास आघाडी चे उमेदवार विजयी करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करणार आहोत.असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.