वरवडे पंचायत समिती मध्ये सोनु सावंत बिनविरोध झाल्याबद्दल पालकमंत्र्यांकडून सत्कार

सोनु सावंत यांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

पालकमंत्री नितेश राणेंच्या बिनविरोध पॅटर्नची सर्वत्र चर्चा

कणकवली : कणकवली तालुक्यातील वरवडे पंचायत समतीकडून भाजपचे पंचायत समिती उमेदवार राजेश उर्फ सोनु सावंत यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांनी बिनविरोध झालेले पंचायत समिती सदस्य म्हणून सोनु सावंत यांचा सत्कार केला. यावेळी ठाकरे शिवसेना व मनसेच्या उमेदवारांनी माघार घेत सोनु सावंत यांना साथ दिल्याबद्दल पाठीवर कौतुकाची थाप पालकमंत्री नितेश राणे यांनी मारली. पालकमंत्री नितेश राणेंच्या बिनविरोध पॅटर्नची चर्चा मात्र सर्वत्र होत आहे. यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलींद मेस्त्री, खरेदी विक्री चेअरमन प्रकाश सावंत, आशिये सरपंच महेश गुरव, पिसेकामते सरपंच सुहास राणे, सत्यवान चव्हान, सादिक कुडाळकर, विजय कदम, प्रदिप राणे, समीर राणे, संकेत राणे, प्रसाद सावंत, बापू राणे, सुशील राणे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांचे मुळ घर असलेल्या वरवडे गावात ही पंचायत समिती बिनविरोध झाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करत आहेत.

error: Content is protected !!