सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस आयोजित ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात सानिका तुळसकर यांचा सन्मान

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस आयोजित पोलीस रेझिंग डे अंतर्गत ज्येष्ठ नागरिक मेळाव्यामध्ये सीताराम संजीवनी आनंदाश्रयच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. मोहन दहिकर (जिल्हा पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग), संपूर्णा गुंडेवाडी (सचिव – जिल्हा विधी सेवा व प्राधिकरण), पद्मश्री परशुराम गंगावणे, राजेश रेगे (जिल्हाध्यक्ष – ज्येष्ठ नागरिक संघटना, सिंधुदुर्ग), विनोद कांबळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी) आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र पोलीस दल वर्धापन दिनाच्या निमित्ताने गुरुवार दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस रेझिंग डे अंतर्गत ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये सीताराम संजीवनी आनंदाश्रयच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांना सन्मानित करण्यात आले.

सानिका तुळसकर या सीताराम संजीवनी आनंदाश्रयच्या मुख्य परिचारिका मुख्य परिचारिका असून आजवर त्यांनी आश्रमाच्या माध्यमातून अनेकांची सेवा केली आहे. अनेकांचे अश्रू पुसण्याचे महनीय कार्य त्यांच्या माध्यमातून झाले आहे. त्यांनी आजवर केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांच्या वतीने आयोजित ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात त्यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

error: Content is protected !!