अमित शहा सोडविणार मुख्यमंत्री पदाचा तिढा

नव्या सरकारचा शपथविधी २ डिसेंबरला?

मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुक झाल्यानंतर आता नव्या मंत्रिमंडळाची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे.त्यातच महायुतीचा विजय झाला असला तरी आता मुख्यमंत्री कोण हा नवा वाद निर्माण झाला आहे.प्रत्येक पक्षातील नेते आपल्या पक्ष श्रेष्ठीला मुख्यमंत्री करण्यास आग्रही आहेत त्यामुळे आता हा तिढा कोण सोडविणार.दरम्यान देवेंद्र फडणवीस हे सोमवारी एका लग्नसमारंभासाठी दिल्लीत गेले होते. याठिकाणी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होईल, अशी चर्चा होती. परंतु, ही भेट होऊ शकली नाही. देवेंद्र फडणवीस हे काल रात्री उशीरा मुंबईत परतले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, आता हा तिढा सोडवण्यासाठी अमित शाह हेच मुंबईत येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाह हे मंगळवारीच मुंबईत येऊ शकतात. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

नव्या सरकारचा शपथविधी २ डिसेंबरला?

भाजप राज्यात राजस्थान पॅटर्न राबवणार की मध्यप्रदेश पॅटर्न याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे. तर दुसरीकडे नव्या सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री ठरवण्याच्या चर्चेची सूत्रे दिल्लीतून हलवली जात आहेत. दरम्यान, शिंदे आणि फडणवीसांसोबत अमित शहा हे आज रात्री चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!