कुडाळ : काहीच दिवसांपूर्वी नगरपंचायत – नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचे निकाल हाती लागल्यानंतर सर्वांना पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. कुडाळ तालुक्यातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे पावशी जिल्हा परिषद मतदारसंघ. या मतदारसंघातून अनेक दिग्गज उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. अशातच एका युवा उमेदवाराचे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे. ते नाव म्हणजे सिद्धेश शंकर परब…
बांबुळी गावचे सुपुत्र असणारे सिद्धेश परब हे आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. प्रत्येकाच्या मदतीला ते नेहमी धाऊन जातात. आमदार निलेश राणे यांच्या राणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या शस्त्रक्रिया अगदी मोफत करण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. यासाठी त्यांनी स्वतः पाठपुरावा केला आहे. सर्वांच्या मदतीला नेहमी धावून जाण्याच्या या स्वभावामुळे अनेकांच्या मनात त्यांच्याबद्दल आपुलकीची भावना आहे. शिवाय फार मोठा युवावर्ग त्यांच्याशी जोडला गेला आहे. वरील सर्व गोष्टींचा विचार करता पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून त्या प्रबळ दावेदार असून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.


Subscribe









