मुंबई प्रतिनिधी: महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची रक्कम वाढवून २१०० केली होती.दरम्यान आता विधानसभा निवडणूक झाली असून महायुती विजयी झाली आहे.त्यामुळे लाडक्या बहिणी पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. तीन महिन्यांतच सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख महिलांसह राज्यातील अडीच कोटी महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आणि राज्य सरकारने त्यांना नोव्हेंबरअखेरचा लाभ विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच दिला.
कधी मिळणार लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता
निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना २,१०० रुपये देण्याची ग्वाही दिली. याचा मोठा फायदा महायुती सरकारला झाला. याची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर २१ एप्रिलपासून होण्याची शक्यता आहे.