वृक्षप्रेमी, सर्वपक्षीय पदाधिकारी व कुडाळ शहरवासीयांचे कुडाळ पोलीस निरीक्षकांना निवेदन
कुडाळ : कुडाळ शहरातील जिजामाता चौकासमोरील संवर्धित वडाचे झाड तोडणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी कुडाळ शहरातील वृक्षप्रेमी, सर्वपक्षीय पदाधिकारी व शहरवासीयांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे सुपूर्त केले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, कुडाळ जिजामाता चौकसमोरील १५० वर्षापुर्वीचे वडाचे झाड आहे. या झाडाची फांदी सोमवार दि.१५ डीसेंबर रोजी पहाटे २.४५ वा. तोडून संवर्धीत झाडाचे नुकसान करण्यात आहे. यामध्ये मनुष्यहानीचा सुद्धा प्रयत्न होता असे प्रत्यक्षदर्शी दिसते. यापुर्वी देखील कुडाळ पोस्टमार्टम रुमकडे जाणाऱ्या रस्त्यावरील झाडे तोडण्यात आलीत. यावर ठोस कारवाई न झाल्यास याच विघ्नसंतोषी व्यक्तीकडुन पुन्हा असे प्रकार होण्याची शक्यता आहे. तरी सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुडाळ शहरातील वृक्षप्रेमी, सर्वपक्षीय पदाधिकारी व शहरवासीयांनी कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.




Subscribe








