नेरूर येथील युवकाची गळफास घेत आत्महत्या

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर गावातील जीवन दीपक कदम या २१ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायं. ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जीवन दीपक कदम (वय २१, नेरूर समतानगर) या युवकाने बुधवारी सायं. ७.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घराच्या वाशाला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती युवकाचे काका सखाराम सीताराम कदम यांनी दिली. आत्महत्येचे कारण अजून समजले नसून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे कदम कुटुंबीयांसह नेरूर गावावर शोककळा पसरली आहे.

error: Content is protected !!