ॲड राजीव बिले यांना कोकणरत्न पदवी प्रदान


स्वतंत्र कोकणराज्य अभियानांतर्गत मराठी पत्रकारभवन आझाद मैदान मुंबई येथे कार्यक्रम संपन्न

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ चे प्रख्यात वकील ॲड राजीव दत्ताराम बिले यांना स्वतंत्र कोकणराज्य अभियानांतर्गत कोकणरत्न पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. हा पदवीप्रदान सोहळा मुंबई येथील आझाद मैदान मराठी पत्रकार भवन येथे संपन्न झाला.

यावेळी स्वतंत्र कोकणराज्य अभियानचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे, वरिष्ठ पत्रकार व संपादक सचिन कळझुनकर, मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर,युवानेते सचिन गावडे, खजिनदार राजेंद्र सुर्वे, अजित गोरूले, बापू परब, मुकेश जय, निहार कोकरे, अनिकेत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

ॲड राजीव बिले गेली अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक व आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेत कार्यरत आहेत. अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग चे अध्यक्ष आहेत,रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे संस्थापक अध्यक्ष व रोटरी सेवाप्रतिष्ठान कुडाळ चे अध्यक्ष आहेत.त्यांच्या या अतुलनिय सामाजिक कार्याची दखल स्वतंत्र कोकणराज्य अभियान या संस्थेने घेत त्यांना मानाची कोकणरत्न पदवी प्रदान करण्यात आली.

ॲड राजीव बिले यांनी कोकणरत्न पदवी आपणास प्राप्त झाली हि खुप मोठी गोष्ट आयुष्यात समाधान देणारी आहे असे गौरवोद्गार काढत स्वतंत्र कोकणराज्य अभियान संस्थेचे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!