कणकवली : अनुभव शिक्षा केंद्र तसेच कणकवली कॉलेज, कणकवली येथील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग (DLLE) यांच्या संयुक्त विद्यमाने “डिजिटल जगातून वास्तवाकडे” या विषयावर शैक्षणिक जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत एच. पी. सी. एल. सभागृह, कणकवली येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी मा. साथी रूपाली कदम या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविका करत सध्याच्या डिजिटल युगातील विद्यार्थ्यांची वाढती मोबाईल व सोशल मीडियावरची अवलंबित्व, त्याचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम यावर सखोल मार्गदर्शन केले. डिजिटल माध्यमांचा योग्य व मर्यादित वापर, वास्तव जीवनाशी नातं जपण्याचे महत्त्व, शिक्षणासोबत मूल्यसंस्कार आणि सामाजिक जाणीव कशी विकसित करावी याबाबत त्यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास कॉलेजचे प्राचार्य डॉ. युवराज महालिंगे, डॉ. राजेंद्र मुंबरकर (जिल्हा समन्वयक, DLLE विभाग), डॉ. हुसे (DLLE विभागप्रमुख, कणकवली कॉलेज), जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर यांची उपस्थिती लाभली. तसेच साथी बुशरा बागवान, सुदीप दिगवळेकर, सिद्धी परब, अथर्व राऊळ , सिद्धेश हुन्नुरे, हर्ष जाधव . यांनी नियोजनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अनुभवातून शिकण्याचे महत्त्व, सामाजिक जबाबदारीची जाणीव व वास्तव जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा संदेश दिला. कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरला. अनुभव शिक्षा केंद्रची प्रक्रिया आणि आभार साथी बुशरा बागवान यांनी केले.



Subscribe






